मुंबई : लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितची आज तळोजा तुरुंगातून सुटका होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातून मंगळवारी कर्नल पुरोहित तळोजा जेलमध्ये परतले. तुरुंग प्रशासनाच्या सर्व औपचारिकता पूर्ण करुन पुरोहित आज जेलबाहेर येईल.


2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल पुरोहितला नऊ वर्षांनी जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. पुरोहितने देश सोडू नये आणि कुठल्याही साक्षीदाराला थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखवू नये असं कोर्टाने म्हटलं आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटात जामीन मिळाल्यानंतर आपल्याया न्याय मिळाला. आता पुढील न्यायालयीन लढाईसाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया प्रसाद पुरोहितने दिली. तर कोर्टाने त्याला रोखीने जामिनाची रक्कम भरण्याची परवानगी दिली आहे.

सुटकेनंतर आपल्या युनिटला रिपोर्ट करणार
जामीनावर तुरुंगाबाहेर आल्यानंतर पुरोहित आपल्या युनिटला रिपोर्ट करेल. लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, 20 जानेवारी 2009 रोजी अटक झाल्यानंतर पुरोहितचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यावेळी तो सैन्याच्या मध्य प्रदेशातील पचमढीमधील युनिटमध्ये कार्यरत होता.
निलंबित अधिकारी किंवा जवानाला जामीन मिळाल्यानंतर त्याला 24 तासात आपल्या युनिटला रिपोर्ट करावा लागतो. सर्व बाबी लक्षात घेऊन सैन्य संबंधित अधिकारी/जवानाच्या निलंबनावर विचारविनिमय करतं. यादरम्यान त्याला 'ओपन अरेस्ट' म्हणजे खुल्या अटकेत ठेवलं जातं. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जातं. त्याला लष्करी गणवेश परिधान करणं आवश्यक असतं, पण विशेष परवानगीत तो साधे कपडेही परिधान करु शकतो.

मालेगाव बॉम्बस्फोट
2008 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता तर 80 जण जखमी झाले होते. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावत एका बाईकमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर स्फोटासाठी आरडीएक्स पुरवणं आणि कट रटल्याच्या आरोपाखआली साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

तळोजा जेलमधून कर्नल पुरोहितांची उद्या सुटका होणार

ले. कर्नल पुरोहित पुन्हा मुंबई हेडक्वार्टरमध्ये ड्युटी जॉईन करणार?

2008 मालेगाव स्फोट : कर्नल पुरोहितला अखेर जामीन

मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी काय?