धोनीच्या बायोपिकमध्ये स्वत:वरील आरोपांवर कैफचं उत्तर
कैफने ट्विट करुन, धोनीच्या बायोपिकाची कथा तरुणांसाठी प्रेरणादायी असून आपली स्वप्न साकार करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात, त्यातून तरुणांना प्रेरणा मिळेल, असं म्हटलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रदर्शनानंतर दोनच दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 41 कोटींहुन अधिक कमाई केली. यातून सुपर हिट सिनेमांना पछाडीवर टाकलं आहे. या सिनेमात धोनीची भूमिका साकारणाऱ्या सुशांत राजपूतच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केलं.
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीच्या मैदानावरीलच खेळीचे साऱ्या जगाने कौतुक केलं, त्यामुळे त्याच्या बायोपिकनेही बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला आहे.
कैफने आपल्या ट्विटमध्ये, या सिनेमात माझा धोनीसोबतचा पहिला सामना देवधर ट्रॉफीमधील दाखवण्यात आला आहे. यावेळी मी सेंट्रल झोनचे नेतृत्व करत होतो, तर धोनी इस्ट झोनकडून खेळताना 87 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. धोनीच्या या खेळीमुळे आम्हाला हा सामना गमवावा लागला होता.
एकेकाळी भारतीय फलंदाजातील मिडल ऑर्डरचा कणा ओळखल्या जाणारा मोहम्मद कैफवरुन सिनेमात एक सीन दाखवण्यात आला आहे. या सीनमध्ये धोनीच्या एकदिवसीय क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात त्याला तो रनाआउट करतो. यावर धोनीच्या नाराज झालेल्या मित्रांनी त्याला शिव्यांची लाखोली वाहील्याचं दाखवलं.
मात्र, या सीनवरुन कैफने सोशल मीडियाच्या माध्यमातून याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.
मात्र, या सिनेमातील एका सीनवर टीम इंडियातील एका माजी फलंदाजाने प्रश्न उपस्थित करुन सिनेमाचे कौतुक केले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -