मुंबई: गुजरात लायन्स या आयपीएल फ्रँचाईझीनं भारताचा माजी कसोटीवीर मोहम्मद कैफची सहप्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
आयपीएलच्या दहाव्या मोसमाला पाच एप्रिलपासून सुरुवात होत आहे. मोहम्मद कैफचा अनुभव आणि त्याचं क्रिकेटचं ज्ञान लक्षात घेता तो आमच्या संघाचं एक बलस्थान ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
कैफचा आजवरचा अनुभव लक्षात घेता त्याला एक मोठी भूमिका देण्याची गरज होती, असं सांगून गुजरात लायन्सचे मालक केशव बन्सल म्हणाले की, कैफच्या त्या भूमिकेचा संघाला निश्चितच लाभ होईल.