नवी दल्लीः इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू मोईन अलीने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपलं दुसरं शतक झळकावलं. अलीने नाबाद 155 धावांची दमदार खेळी खेळली. मात्र, अली 1897 साली भारताच्या एका खेळाडूने केलेलं रेकॉर्ड मोडण्यापासून दूर राहिला.


 

सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अलीने 207 चेंडूमध्ये 17 चौकार आणि 2 षट्कारांच्या साहाय्याने नाबाद 155 धावांची खेळी केली. भारताचं 1897 साली झालेलं रेकॉर्ड तुटणार असं दिसत असतानाच इंग्लंडचा कर्णधार अलीस्टर कुकने 9 बाद 498 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळं भारताच्या खेळाडूचं रेकॉर्ड सुरक्षित राहिलं.

 

काय आहे ते रेकॉर्ड?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना इंग्लंडचा भारतीय वंशाचा माजी खेळाडू रणजित सिंह याने 13 डिसेंबर 1897 साली सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 175 धावांची खेळी खेळली होती. जी इंग्लंडसाठी सातव्या क्रमांकावर खेळली गेलेली सर्वात मोठी खेळी आहे.

 

हे रेकॉर्ड होऊन जवळपास 119 वर्ष झाले आहेत. मात्र, भारताच्या प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक रणजित सिंह यांनी केलेलं हे रेकॉर्ड आतापर्यंत कोणीही तोडू शकलेलं नाही.