सरपंचाकडून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, कर्नाटकातील मंड्यात खळबळ
एबीपी माझा वेब टीम | 28 May 2016 02:28 PM (IST)
मंड्या (कर्नाटक) : सरपंचानेच गावातील विधवा महिलेवर केलेला बलात्काराचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील केस्तूर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रहास असं या आरोपी सरपंचाचं नाव असून तो धर्मनिरपेक्ष जनता दलाचा नेता आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी पीडित महिला ग्रामपंचायत कार्यालयात काम करत होती. यावेळी इतर कर्मचारी निघून गेल्यानंतर चंद्रहासने पीडित महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार ग्रामपंचायत कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या घटनेनं कर्नाटकात खळबळ उडाली आहे.