मुंबई : काँग्रेसकडून विधान परिषदेसाठीच्या उमेदवारीसाठी नारायण राणे यांचं नाव निश्चित झालं आहे. विधान परिषदेची उमेदवारी मिळविण्यासाठी राणे गेल्या काही दिवसांपासून सक्रिय होते.


 

आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी राणेंनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला होता. मुंबई स्थानिक स्वराज्य संघातील या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये तब्बल 52 जण इच्छूक होते. त्यासाठी जोरदार फिल्डींगही लावण्यात आली होती.

 

हर्षवर्धन पाटील, मुजफ्फर हुसेन आणि सचिन सावंत यांचीही नावं आघाडीवर होती. मात्र, अखेरीस नारायण राणे त्यांना विधानपरिषदेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 52 इच्छुकांवर नारायण राणे यांनी बाजी मारली आहे.