टी-20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावा करणारी मिताली राज पहिली भारतीय फलंदाज ठरली होती. विशेष म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांच्याही आधी मितालीने 2 हजार धावांचा टप्पा पार केला होता. भारतातर्फे टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या मितालीच्याच नावावर आहे.
मिताली राजने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी 2021 सालचा वन डे विश्वचषक तिचं सध्याचं लक्ष्य असल्याचे तिने सांगितले आहे.
विश्वचषकात भारताचीच बाजी, मिताली राजला विश्वास | मुंबई | ABP Majha