नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजचा सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. यामध्ये मिताली सागी नेसून क्रिकेट खेळताना दिसत आहे. मिताली हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.


मितालीचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिलेला आहे आणि या व्हिडिओचे कौतुक देखील करत आहेत. हा एक जाहिरातचा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये मिताली साडी नेसून मैदानात खेळत आहे मितालीची खास स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडली आहे. मितालीने मागील वर्षी टी -20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.


मिताली राजने भारतीय टीमच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन केले. तिने ट्वीट करून लिहिले की, 'भारतीय असल्याने मी भारतीय महिला संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. पण एक क्रिकेटपटू म्हणून इंग्लंडच्या संघाचं दु:ख मला समजते. मला अशा परिस्थितीत स्वत: ला किंवा माझ्या टीमला कधीही पहायला आवडणार नाही, परंतु नियम सारखेच आहेत. मुलींनो अभिनंदन, ही एक मोठी गोष्ट आहे.

रताचा सामना 8 मार्च रोजी मेलबर्नला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय महिलांनी आजवर कधीही फायनलमध्ये धडक मारलेली नव्हती. फायनलच्या या उंबरठ्यावर भारतासमोर लागोपाठ दुसऱ्यांदा इंग्लंडचं आव्हान होतं. 2018 सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात इंग्लंडनं भारताचं आव्हान उपांत्य फेरीतंच संपुष्टात आणलं होतं. पण त्याआधीही ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताला इंग्लंडला कधीच हरवता आलेलं नव्हतं. इंग्लंडचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातला भारताविरुद्धचा रेकॉर्ड हा 5-0 असा आहे. यंदाच्या स्पर्धेत साखळी फेरीत भारतीय संघ अजिंक्य होता, पण इंग्लंडने 2009, 2012, 2014, 2016 आणि2018च्या विश्वचषकात भारताला हरवले होते.

संबंधित बातम्या : 

Women's T20 World Cup | भारतीय संघाची पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाशी होणार अंतिम मुकाबला

म्हारी छोरी भी छोरो से कम नहीं...