IPL vs PSL Salary : कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला आजवरच्या विक्रमी किंमतीत 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले. मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण तुम्हाला माहित आहे का आयपीएलमध्ये मिचेल स्टार्कच्या 1 बॉलची किंमत किती असेल? तसेच पाकिस्तान सुपर लीगच्या तुलनेत किती मोठी रक्कम आहे? आयपीएलमध्ये मिचेल स्टार्कच्या प्रत्येक चेंडूची किंमत 7.3 लाख रुपये आहे. त्याचवेळी, आयपीएलमधील खेळाडूंना मिळणाऱ्या पैशांच्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीगचा पगार खूपच कमी आहे.






आयपीएल पगाराच्या तुलनेत पीएसएल कुठे आहे?


आयपीएलमधील एका सामन्यासाठी मिचेल स्टार्कची फी पाकिस्तान सुपर लीगमधील सर्वात महागड्या खेळाडूपेक्षा जास्त आहे. पाकिस्तान सुपर लीगमधील सर्वात महागड्या खेळाडूचे मानधन 1.4 कोटी रुपये आहे. या पगाराची तुलना मिचेल स्टार्कला मिळालेल्या पैशाशी केली तर हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलच्या केवळ 1 सामन्यातून इतका पैसा कमावतो. मिचेल स्टार्कची एका सामन्याची फी 1.7 कोटी रुपये असेल. त्याच वेळी, आयपीएलमध्ये मिचेल स्टार्कच्या प्रत्येक चेंडूची किंमत 7.3 लाख रुपये असेल. मात्र, पाऊस किंवा अन्य कारणामुळे सामना रद्द झाल्यास ही किंमत बदलेल.






आयपीएल लिलावात पहिल्यांदाच 20 कोटी रुपयांवर बोली 


मंगळवारी आयपीएल लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपये खर्च करून मिचेल स्टार्कला आपल्या संघाचा भाग बनवले. तर पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले. आयपीएल लिलावात खेळाडूची किंमत 20 कोटींच्या पुढे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेललाही चांगली किंमत मिळाली. चेन्नई सुपर किंग्सने डेरिल मिशेलला सुमारे 14 कोटी रुपयांना खरेदी केले.






इतर महत्वाच्या बातम्या