IPL 2024 Unexpected Expensive Players: IPL 2024 चा लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईमध्ये झाला, ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक बोली लावण्यात आल्या. लिलावात काही खेळाडूंना संघांनी एवढ्या रकमेत विकत घेतले की क्रिकेट चाहत्यांना विश्वास बसेनासा झाला आहे. केवळ परदेशीच नाही तर अनकॅप्ड खेळाडूंसह भारतीय खेळाडूही धक्कादायक महागड्या किमतीत विकले गेले. संघांनी अनकॅप्ड खेळाडूंवर पैशांचा वर्षाव केला.
चला तर मग जाणून घेऊया लिलावात धक्कादायक रक्कम भरून कोणत्या खेळाडूंना खरेदी करण्यात आले.
1- पॅट कमिन्स (Pat Cummins)
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला सनराजर्स हैदराबादने 20.50 कोटींना विकत घेतले. कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कमिन्सची किंमत पाहून चाहत्यांना नक्कीच धक्का बसला.
2 - हर्षल पटेल (Harshal Patel)
भारतीय वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला पंजाब किंग्जने 11.75 कोटी रुपयांना विकत घेतले. हर्षलची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. हर्षलला आयपीएल 2024 पूर्वी आरसीबीने सोडले होते, त्यानंतर त्याला इतकी मोठी रक्कम मिळण्याची फार कमी आशा होती.
3- स्पेन्सर जॉन्सन (Spencer Johnson)
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनला गुजरात जायंट्सने मोठ्या भावात विकत घेतले. गुजरातने जॉन्सनला 10 कोटी रुपयांना आपला हिस्सा बनवला, तर त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.
4- समीर रिझवी (Sameer Rizvi)
उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या समीर रिझवीसाठी चेन्नई सुपर किंग्स मैदानात उतरले आणि संघाने त्याला 8.40 कोटी रुपयांना विकत घेतले. समीर मेरठचा रहिवासी आहे, त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती, पण चेन्नईने त्याला एका क्षणात करोडपती बनवले.
5- रोवमन पॉवेल (Rovman Powell)
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आणि संघाचा T20 आंतरराष्ट्रीय कर्णधार रोवमन पॉवेलला राजस्थान रॉयल्सने 7.40 कोटी रुपयांना विकत घेतले. पॉवेलची मूळ किंमत एक कोटी रुपये होती.
6- कुमार कुशाग्र (Kumar Kushagra)
झारखंडकडून खेळणाऱ्या कुमार कुशाग्राला दिल्ली कॅपिटल्सने 7.20 कोटी रुपयांना विकत घेतले. दिल्लीने 19 वर्षीय अनकॅप्ड कुमार कुशाग्रावर एवढी मोठी बोली लावून सर्वांनाच चकित केले होते. तो यष्टिरक्षक फलंदाज आहे.
इतर महत्वाच्या बातम्या