फेल्प्सने 51.14 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकल. पण विशेष म्हणजे या स्पर्धेत फेल्प्ससह दक्षिण आफ्रिकेच्या चॅड ली क्लोज आणि हंगेरीच्या लासल्सो सेह यांनीही 51.14 सेंकदाचीच वेळ नोंदवली. त्यामुळे या तिघांनीही रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं.
दरम्यान सिंगापूरच्या जोसेफ स्कूलिंगने 50.39 सेंकदाची वेळ नोंदवून नवा ऑलिम्पिक विक्रम रचला आणि सुवर्णपदकाची कमाई केली. महत्त्वाचं म्हणजे सिंगापूरचं हे पहिलंच सुवर्णपदक ठरलं आहे.