हेडलाईन्स


1.पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य घटक, सर्वपक्षीय बैठकीत नरेंद्र मोदींनी ठणकावलं, सुरक्षेशी तडजोड न करता काश्मीरचा विश्वास संपादन करणार

----------------------

2 .संसदेच्या पावसाळी अधिवेशनात यंदा तब्बल 15 विधेयकं मंजूर, 2004 नंतरचं सर्वात यशस्वी अधिवेशन, मोदींकडून खासदारांचे कौतुक

-----------------------

3. दाऊद सोबतच्या वाढत्या संबंधांमुळे पत्रकार जेडेला ठार केलं, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची सीबीआयकडे कबुली

-------------------------

4. अमेरिकेत पुन्हा एकदा शाहरुख खान इमिग्रेशनच्या ताब्यात, ट्विटरवरुन किंग खाननं भडास, काँग्रेस नेत्यांकडूनही शाहरुखची पाठराखण

----------------------

5. डागाळलेल्या निलंगेकरांचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचीच गोची, व्हिक्टोरिया फूड्सच्या लिलावाची घोषणा, 49 कोटीचं कर्ज थकवलं

-----------------------

6. एल्फिस्टनमध्ये अनधिकृत फ्लेक्स काढल्यानं पालिका अभियंत्यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मारहाण,नगरसेविका रत्ना महालेंच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

-------------------------

7. नागपूरचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या पत्नीला भोंदूबाबानं 51 हजारांचा गंडा घातला, सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद, वडेट्टीवारांची पोलिसात तक्रार

-------------------------

8. अवयव प्रत्यारोपणापुर्वी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीकडून होणार चौकशी, तर किडनी रॅकेटप्रकरणी कुणालाही सोडणार नाही, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचा इशारा

--------------------------

9. चिपळूण-कराड नव्या रेल्वे मार्गाला गती मिळणार, 14 ऑगस्टला सामंजस्य करार होणार, राज्यात 9 तर कर्नाटकात 2 स्टेशन्स उभारणार

---------------------------

10. टेनिस आणि बॉक्सिंगमध्ये भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या, सानिया मिर्झा-रोहन बोपण्णा उपांत्य फेरीत, तर बॉक्सर विकास क्रिशनचीही उपांत्यपूर्व फेरीत धडक

-----------------

एबीपी माझा वेब टीम