स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकलला ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद
एबीपी माझा वेब टीम | 12 Aug 2016 06:40 PM (IST)
मेलबर्न: भारताची अव्वल स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकलनं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये झालेल्या या स्पर्धेत दीपिकानं अंतिम फेरीत इजिप्तच्या मायार हॅनीवर 10-12, 11-5, 11-6, 11-4 अशी मात केली. दीपिका आता जागतिक दुहेरी स्क्वॉश विजेतेपद स्पर्धेत सहभागी होईल. डार्विनमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत दीपिका महिला दुहेरीत भारताच्या जोश्ना चिनाप्पाच्या साथीनं खेळताना दिसेल. मिश्र दुहेरीत दीपिकाला सौरव घोषालची साथ मिळेल. या विजयामुळे दीपिकाकडून चाहत्यांच्य आणखी अपेक्षा उंचावल्या आहेत.