MI vs RR, IPL 2021 1st Innings Highlights: राजस्थान आणि मुंबई दरम्यान दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयपीएल सामना सुरु आहे. मुंबईला या सामन्यात विजयासाठी राजस्थाननं 172 धावांचं आव्हान दिलं आहे. राजस्थानला सलामीच्या जोडीनं चांगली सुरुवात करून दिली. सलामीला आलेल्या जोस बटलरने 32 चेंडूत 41 धावा केल्या. त्यात त्याने 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. तर यशस्वी जयस्वालने 20 चेंडूत 32 धावा केल्या. सुरुवात चांगली होऊन देखील मोठी धावसंख्या उभारण्यात कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांना अपयश आलं. त्यामुळे राजस्थाननं 171 धावांपर्यंत मजल मारता आली. संजू सॅमसनकडून 27 चेंडूत 42 धावा केल्या तर शिवम दुबे 35 धावा करत तंबूत परतला.
मुंबईला आतापर्यंत 5 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळाला असून 3 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मुंबईचा संघ पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. राजस्थानचा संघानेही 5 पैकी 2 सामन्यांत विजय मिळाला असून तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ पॉईंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. अशातच दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करताना दिसणार आहेत. यंदाच्या सीझनमधील दोन्ही संघांचा हा सहावा सामना असणार आहे.