मुंबई : भारत-पाकिस्तान सामन्यानंतर देशात मॅच फिक्सिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारत-पाकिस्तान सामन्यानंतर चौकशी करण्याची मागणी केली होती. आता सोशल मिडियावर मॅच फिक्सिंगसंदर्भात एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात विशाल कारिया या मुंबईच्या एका व्यावसायिकाचे नाव आहे.




मॅच फिक्सिंगची प्रकरणं नेहमीच चर्चेत असतात. मात्र, मुंबईतील व्यावसायिकाचं यात नाव आल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.



कोण आहे विशाल कारिया?

विशाल कारिया मुंबईतला व्यावसायिक असून, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, हरजभजन सिंग यांसारख्या खेळाडूंशी त्याची मैत्री आहे. मुंबईसह अनेक प्रमुख शहरांमध्ये त्याची मालमत्ता आहे. विशाल आणि दुबईत स्थायिक असलेला त्याचा साथीदार हितेश संघवी हे दोघेही मॅच फिक्सिंगच्या व्यवसायात यापूर्वीपासून आहेत, असं व्हायरल मेसेजमध्ये म्हटलंय. आपल्या आरामदायी आयुष्यासाठी नावाजलेल्या या दोघांचे अनेक राजकारण्यांशी चांगले संबंध देखील आहेत आणि सर्वांना त्यांच्या मॅच फिक्सिंगसाठी लागणाऱ्या कौशल्याची चांगली जाण आहे, असेही यात म्हटलंय.



कोणता मेसेज व्हायरल होत आहे?