भुवनेश्वर : भारतानं कॅनडाचा 5-1 असा धुव्वा उडवून, भुवनेश्वरमध्ये सुरु असलेल्या हॉकी विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. विश्वचषकाच्या 'क' गटात भारताचा हा दुसरा विजय ठरला. या सामन्यात हरमनप्रीतसिंगनं पहिल्या सत्रात बाराव्या मिनिटाला भारताचं खातं उघडलं.
भारताच्या उर्वरित चारही गोलची नोंद ही चौथ्या सत्रात झाली. भारताकडून ललित उपाध्यायनं दोन, तर चिंगलेनसाना सिंग आणि ललित उपाध्यायनं प्रत्येकी एक गोल मारला.
कॅनडाचा एकमेव गोल हा फ्लोरिस वॅन सॉननं 39 व्या मिनिटाला केला. भारतानं दोन विजय आणि एका बरोबरीसह क गटात अव्वल स्थान राखलं.
मनप्रीत सिंहच्या नेतृत्वात टीम इंडियाने या विश्वचषकात शानदार प्रदर्शन केलं आहे. भारताने या विश्वचषकाच्या सुरुवातीपासून चांगल प्रदर्शन करत क गटात अव्वल स्थान राखलं आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 5-0ने हरवलं होतं. बेल्जिअम विरुद्ध भारताचा सामना 2-2 ने बरोबरीत सुटला होता.