मुंबई : क्रिकेट हा धर्म मानल्या जाणाऱ्या भारतात सामना जिंकल्यावर खेळाडूंना डोक्यावर घेऊन नाचलं जातं, तसं पराभवानंतर अब्रूचे वाभाडेही काढले जातात. क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची सोशल मीडियावर खिल्ली उडवणाऱ्यांना त्याची पत्नी आणि सुप्रसिद्ध अँकर मयंती लँगरने सडेतोड उत्तर दिलं आहे.

 
27 ऑगस्टला फ्लोरिडात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात स्टुअर्ट बिन्नीच्या गोलंदाजीवर विंडीजने तुफान धावा ठोकल्या. बिन्नीने टाकलेल्या एकमेव ओव्हरमध्ये विंडीजचा ओपनर एविन ल्युईसने पाच षटकारांसह 32 धावा केल्या.

 

'आपल्या प्रियजनांच्या मृत्यूची मागणी कोणीच करत नाही. मला आत्महत्येवरुन टोमणे मारणं लज्जास्पद आहे. अशा घटनांचा फटका बसलेल्या कुटुंबांचा तरी विचार करा. त्यांचं दुःख तुम्ही विनोदाच्या पातळीवर आणून सोडलंय' असं मयंतीने म्हटलं आहे. 'अशाप्रकारे खिल्ली उडवल्याने तुम्हाला बरं वाटलं असेल, अशी आशा आहे.' अशा शब्दात मयंतीने संताप व्यक्त केला आहे. 'मी वयाच्या 18 व्या वर्षापासून काम करत आहे. त्यामुळे मी श्रीमंत पुरुषाच्या शोधात होते, असा आरोप करण्याऐवजी स्वतःकडे बघा' असंही ती म्हणते.

 

 

https://twitter.com/MayantiLanger_B/status/771176877654286337

 
विंडीजने अवघ्या एका धावेने हा सामना जिंकून मालिकाही खिशात घातली. पावसामुळे दुसरा सामना रद्द झाला होता. स्टुअर्ट हा माजी क्रिकेट सिलेक्टर रॉजर बिन्नी यांचा मुलगा. मयंती लँगर आणि स्टुअर्ट 2012 मध्ये विवाहबद्ध झाले होते.

 

यापूर्वी विराट कोहलीच्या खराब कामगिरीनंतर अनुष्का शर्मावरुनही सोशल मीडियावर विनोद सुरु होते. त्यानंतर विराटनेही संताप व्यक्त केला होता.