नवी मुंबई : खारघरला पनवेल महापालिकेतून वगळण्यासाठी खारघरवासिय आक्रमक झाले आहेत. खारघरला स्वतंत्र नगरपालिकेचा दर्जा देण्यासाठी खारघर कृती समितीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
कृती समितीमध्ये प्रामुख्याने केरळी, मारवाडी, बंगाली समाजाच्या नागरिकांचा आणि दुकानदारांचा समावेश आहे.
खारघरचा 40 टक्के विकास झाला असून उर्वरित विकास येत्या 4 ते 5 वर्षात पूर्ण होईल, असा कृती समितीचा दावा आहे.
अवघ्या एका दिवसापूर्वी पनवेल महापालिका स्थापन करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. तसंच येत्या 7 दिवसात अंतिम अधिसूचना काढण्याचे निर्देशही राज्य सरकारला देण्यात आलेत. त्यामुळे आता नेमकं काय होणार हे पाहावं लागेल.