मुंबई : भारतीय संघाचा माजी खेळाडू मास्टर ब्लॉस्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर उद्या, 24 एप्रिलला वयाची 46 वर्ष पूर्ण करेल. उद्या त्याचा वाढदिवस. मात्र यंदा वाढदिवसाला कुठलंही सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. यंदा देशात कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या खडतर काळात कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सचिन यंदाचा वाढदिवस साजरा करणार नाही, अशी माहिती सचिनच्या जवळच्या मित्राने पीटीआयला दिली आहे.
'ही वेळ कोणतंही सेलिब्रेशन करण्याची नाही. सध्याच्या काळात डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी करोनाचा सामना करण्यासाठी घराबाहेर आहेत, अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचं सचिनने ठरवलं आहे, अशी माहिती सचिनच्या मित्राने दिली आहे.
लॉकडाऊनमध्ये सचिनच्या हातात बॅट नाही तर कात्री!
कोरोनाविरुद्ध लढ्यात सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री सहायता निधीला 50 लाखांची मदत केली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सचिन तेंडुलकरसह अनेक खेळाडूंशी संवाद साधला होता. त्यावेळी कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी पूर्णपणे मदत करू असा विश्वास त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला होता.
ABP EXCLUSIVE | देशासाठी शक्य ते सर्व करू; सचिन तेंडुलकर-सौरव गांगुलीची पंतप्रधानांना ग्वाही
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या काळात सेलिब्रेटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वच घरात बसून आहेत. या लॉकडाऊनमुळे दैनंदिन कामेही खोळंबली आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सरकार आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे. नुकतेच सचिनने कात्री घेत स्वतःचेच केस कापले असल्याचे मजेशीर फोटो आपल्या इस्टाग्रामवर शेअर केले होते.
उद्या मास्टर ब्लॉस्टर सचिनचा वाढदिवस, मात्र 'या' कारणामुळं सेलिब्रेशन नाही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Apr 2020 09:23 AM (IST)
उद्या मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. तो 47 व्या वर्षात पदार्पण करतोय.
मात्र यंदा वाढदिवसाचं कुठलंही सेलिब्रेशन करणार नसल्याचं त्याच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -