मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांची बीसीसीआयच्या सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं. बीसीसीआय कार्यकारिणीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत लोढा समितीच्या शिफारशींविषयी चर्चा झाली.
या शिफारशींची अंमलबजावणी करण्याविषयी न्यायमूर्ती काटजू यांची समिती बीसीसीआयला मार्गदर्शन करेल. या चार सदस्यीय समितीत न्यायमूर्ती काटजू आणि बीसीसीआयचे विधीज्ञ अभिनव मुखर्जी यांच्यासह दोन अन्य कायदेतज्ञांचा समावेश असेल.
दरम्यान, लोढा समितीच्या शिफारशी लागू होईपर्यंत क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएसनच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, जम्मू काश्मिर क्रिकेट असोसिएशनची निवडणूकही रद्द ठरवण्यात आली आहे.