मुंबईत इस्टर्न फ्री वे वर कारला आग, जीवितहानी नाही
एबीपी माझा वेब टीम | 02 Aug 2016 03:11 PM (IST)
मुंबई : मुंबईतल्या इस्टर्न फ्री वेवर एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इस्टर्न फ्री वेवर रे रोडजवळ संध्याकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास टाटा इंडिगो या कारने अचानक पेट घेतला. आगीमध्ये कार जळून खाक झाली, तर चालक वेळीच कारबाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. कारची आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. या अपघातानंतर इस्टर्न फ्री वेवर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने सध्या वाहतूक सुरळीत आहे.