रिओ पॅरालम्पिकमध्ये भारताची 'सुवर्ण' कमाई
पॅरालम्पिकच्या इतिहासातील भारताचं हे तिसरं सुवर्णपदक आहे. याआधी स्विमर मुरलीकांत पेटकर यांनी 1972 मधल्या हेजवर्ग आणि भालाफेकपटू देव झाजरिया यांनी 2004च्या अथेन्स पॅरालिम्पिक्समध्ये सुवर्णपदकावर नाव कोरंल होतं. त्यांच्यानंतर सुवर्णपदक जिंकणारा थांगावेलू हा तिसरा भारतीय ठरला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया स्पर्धेत अमेरिकेच्या सॅम ग्रेवेने रौप्य पदकाची कमाई केली.
थांगावेलूने 1.89 मीटर उडी मारत सुवर्ण तर भाटीने 1.86 मीटर उडी मारुन कांस्यपदक पटकावलं. दुसरीकडे भाला फेक प्रकारात संदीपचं कांस्यपदक थोडक्यात हुकलं. त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
रिओ दी जनैरो : रिओ पॅरालम्पिकमध्ये उंच उडी प्रकारात मरियप्पन थांगावेलूने सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला आहे.
भारतानं तब्बल 12 वर्षांनंतर सुवर्णपदक मिळवलं आहे. तर वरुण सिंह भाटीने याच प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -