माणिक हा कोल्हापूर शहरचा पैलवान. अंतिम सामन्यात त्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या सोनबा गोंगाणेला हरवलं.
माणिक कारंडेचे वडील मधुकर कारंडे यांचं 6 डिसेंबरला निधन झालं होतं. मधुकर कारंडे यांची आपल्या लेकाला मोठं पैलवान झालेलं पाहण्याची इच्छा होती. त्यामुळं एका दिवसात वडिलांचं कार्य उरकून माणिक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उतरला आणि त्यानं यश खेचून आणलं.
माणिक कारंडेनं माती विभागाच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदकाचा मान मिळवला.
या स्पर्धेत माती विभागाच्या 57 किलो वजनी गटात इंदापूरच्या सागर मार्कडनं सुवर्णपदक तर सोलापूरच्या ज्योतिबा अटकळेनं रौप्यपदक पटकावलं. पुणे शहरच्या उत्कर्ष काळेनं 65 किलो वजनी गटात मॅट विभागाचं सुवर्णपदक मिळवलं. उत्कर्षनं पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सागर लोखंडेवर मात केली.