सारावाक (मलेशिया) : भारताची फुलराणी सायना नेहवालनं आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. मलेशिया मास्टर्स ग्रां-प्री गोल्ड स्पर्धेचं विजेतेपद सायनाने पटकावलं आहे.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सायनानं थायलंडच्या पोर्णपवी चोचुवांगला 22-20, 22-20 अशी झुंज दिली. लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यविजेत्या पोर्णपवीचं आव्हान सायनाने मोडून काढलं. खेळाच्या सुरुवातीला सायना काहीशी बॅकफूटवर होती.
दुखापतीने उचल खाल्ल्यानंतर सायना पटकावलेलं हे पहिलंच जेतेपद आहे. बीडब्ल्यूएफ स्पर्धांच्या इतिहासात तिचं हे कारकीर्दीतलं तेविसावं विजेतेपद होतं.