मुंबई : भारतीय वनडे आणि टी 20 क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कप्तानपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चाहत्यांसाठी दिलाशाची बाब म्हणजे माही टीम इंडियामध्ये खेळत राहणार आहे. बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती दिली आहे. इंग्लंडविरोधात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी उद्या टीम इंडियाची निवड होणार आहे. त्यामुळे वनडे मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर असेल, हे उद्याच स्पष्ट होऊ शकेल. विराट कोहलीकडे कर्णधारपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र  याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत 2007 मध्ये झालेला टी 20 आणि 2011 मध्ये भारतात झालेला वनडे असे दोन्ही विश्वचषक जिंकले आहेत. 2013 मध्ये इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीही धोनीच्या नेतृत्वात जिंकण्यास भारताला यश आलं होतं. धोनीच्या नेतृत्वात भारताने 199 वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 110 सामने तो जिंकला असून 74 सामने भारताने गमावले. कर्णधार म्हणूम धोनी 72 टी20 सामने खेळला. त्यापैकी 41 सामन्यांत विजय तर 28 सामन्यात भारताला पराभव मिळाला. धोनीने कर्णधार म्हणून वनडेमध्ये 86 च्या स्ट्राईक रेटने 6 हजार 633 धावा ठोकल्या आहेत. तर टी20 मध्ये धोनीने कप्तान म्हणून 122.60 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 112 धावा केल्या आहेत. 30 डिसेंबर 2014 रोजी धोनीने तडकाफडकी निर्णय घेत कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. ऑस्ट्रेलियात झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर धोनीनं आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. धोेनीच्या क्रिकेट कारकीर्दीवर एक नजर :
कसोटी वन डे टी 20 IPL
एकूण धावा 4,876 9,110
1112
3272
सरासरी 38.09 50.89
35.87
39.42
शतकं/अर्धशतकं 6/33 9/61 0/0 0/16
सर्वोच्च धावा 224 183* 48 70
सामने 90 283 73
143

संबंधित बातम्या  :

वन डे, टी20 च्या कर्णधारपदावरुन महेंद्रसिंह धोनी पायउतार