जालना : महाराट्र केसरी स्पर्धेत आज खूप चुरशीचे सामने पाहायला मिळाले. 61 किलो वजनी गटाच्या माती विभागात सेमी फायनलमध्ये पुणे शहराच्या निखिल कदमने साताऱ्याच्या सागर सुळचा 7-0 अशा गुणफरकाने पराभव करून अंतिमफेरीत गाठली आहे. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सांगलीच्या राहुल पाटीलने उस्मानाबादच्या दत्ता मेटेचा 12-11 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.
पुणे शहराच्या निखिल कदमे उपांत्यपूर्व फेरीत सोलापूरच्या आबासाहेब अटकळेला 4-2 असे नमवून उपांत्यपूर्व गाठली होती. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सांगलीच्या राहुल पाटील आणि उस्मानाबादच्या दत्ता मेटे यांच्यात झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत राहुल पाटीलने दत्ता मेटेवर 12-11 असा निसटसा पराभव करून अंतिमफेरीत प्रवेश केला. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत साताऱ्याच्या सागर सूळने उस्मानाबादच्या दत्ता मेटेवर 5-4 अशी मात करत कांस्यपदकाची कमाई केली.
61 किलो वजनी गटात गादी विभागाच्या सेमी फायनलमध्ये कल्याणच्या जयेश साळवीने नाशिकच्या सागर बर्डेचा 10-0 असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने जालन्याच्या अक्षय धानोरेवर 4-2 अशी मात करून अंतिम फेरी गाठली आहे.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत नाशिकच्या सागर बर्डेने औरंगाबादच्या नुमेश पिंपळेचा 8-2 अशा गुणफरकाने पराभव करून कांस्यपदक पटकावले, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या विजय पाटीलनेही जालन्याच्या अक्षय धानोरेवर 10-0 अशी मात करत कांस्यपदक जिंकले.
महाराष्ट्र केसरी : 61 किलो गटात पुण्याचा निखिल कदम, सांगलीचा राहुल पाटील फायनलमध्ये
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Dec 2018 06:45 PM (IST)
महाराट्र केसरी स्पर्धेत आज खूप चुरशीचे सामने पाहायला मिळाले. 61 किलो वजनी गटाच्या माती विभागात सेमी फायनलमध्ये पुणे शहराच्या निखिल कदमने साताऱ्याच्या सागर सुळचा 7-0 अशा गुणफरकाने पराभव करून अंतिमफेरीत गाठली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -