जालना : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशन हे जालना येथील आझाद मैदानावर सुरु आहे. या स्पर्धेचे आयोजन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी (21 डिसेंबर 2018) जालनावासियांनी मोठी गर्दी केल्याने मैदान तुडुंब भरले होते.
तिसऱ्या दिवशी गादी आणि माती विभागातील 61, 70 आणि 86 किलो वजनी गटातील सेमीफायनल आणि फायनलच्या लढतीसह 74, 97 आणि 86 ते 125 (महाराष्ट्र केसरी गट) किलोच्या प्रेक्षणीय लढतींनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
61 किलो माती विभागात निखिल कदम आणि सांगलीच्या राहुल पाटील यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत निखिलने सुवर्णपदक आपल्याकडे खेचून आणलं. तर राहुल पाटीलला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. 61 किलोच्या गादी विभागात कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने कल्याणच्या जयेश सांगवीला 10-0 अशा फरकाने हरवून सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली.
70 किलो गादी विभागात पुण्याच्या शुभम थोरात विरुद्ध स्वप्निल पाटील कोल्हापूर अशा झालेल्या कुस्तीत शुभम थोरातने बाजी मारली. तर, याच वजनी गटात माती विभागातून मछिंद्र निंगुरेला मागे टाकत पुण्याच्या गोकुळवस्ताद तालमीतल्या राम कांबळेने सुवर्णपदक पटकावले.
86 किलोच्या माती विभागात बालाजी येलगुंदेला नमवत कोल्हापुरचा शशिकांत बोगांर्डे सुवर्णवीर ठरला. पुण्याचा अनिकेत खोपडे आणि अहमदनगरचा अक्षय कावरे यांच्यात अंतिम लढत झाली. त्यात अक्षय कावरेने बाजी मारत सुवर्णझेप घेतली.
शुक्रवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्र केसरीच्या खुल्या गटाचे ड्रॉही पाडण्यात आले. गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि डार्क हॉर्स होण्याच्या तयारीत आलेला शिवराज राक्षे यांच्यातली लढत, मुन्ना झुंजुरके विरुद्ध समाधान पाटील, माऊली जमदाडे विरुद्ध संतोष दोरवडे, विक्रम वडतिले विरूद्ध विष्णु खोसे अशा काही चटकादार कुस्त्या आजच्या महाराष्ट्र केसरी विभागात पाहायला मिळाल्या.
अंतिम निकाल :
61 किलो गादी (मॅट) विभाग
प्रथम- सौरभ पाटील (कोल्हापूर)
द्वितीय-जयश सांगवी (कल्याण)
तृतीय-सागर बर्डे (नाशिक)
तृतीय-विजय पाटील (कोल्हापूर)
61 किलो माती विभाग
प्रथम- निखिल कदम (पुणे)
द्वितीय -राहुल पाटील (सांगली)
तृतीय-अरुण खेगळे (पुणे)
70 किलो गादी (मॅट) विभाग
प्रथम- शुभम थोरात (पुणे)
द्वितीय - स्वप्नील पाटील (कोल्हापूर)
70 किलो माती विभाग
प्रथम- राम कांबळे (कोल्हापूर)
द्वितीय- मच्छिंद्र निंगुरे (कोल्हापूर)
तृतीय-अरुण खेंगळे (पुणे)
86 किलो गादी (मॅट) विभाग
प्रथम- अक्षय कावरे (अहमदनगर)
द्वितीय -अनिकेत खोपडे (पुणे)
तृतीय-भैरु नाते तृतीय-विवेक (सांगली)
86 किलो माती विभाग
प्रथम- शशिकांत बोगर्डे (कोल्हापूर)
द्वितीय-बालाजी यलगुंदे (जालना)
तृतीय- दत्ता नसळे (कोल्हापूर)
महाराष्ट्र केसरी : तिसऱ्या दिवसाच्या लढतींचा निकाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Dec 2018 10:44 AM (IST)
तिसऱ्या दिवशी गादी आणि माती विभागातील 61, 70 आणि 86 किलो वजनी गटातील सेमीफायनल आणि फायनलच्या लढतीसह 74, 97 आणि 86 ते 125 (महाराष्ट्र केसरी गट) किलोच्या प्रेक्षणीय लढतींनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -