Maharashtra Kesari 2025 Pruthviraj Mohol Vs Mahendra Gaikwad : 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला आहे. अंतिम सामन्यात 2-1 गुणांच्या आधारावर पृथ्वीराज मोहोळने सोलापूर जिल्ह्यातील महेंद्र गायकवाडचा (Mahendra Gaikwad) पराभव केला, आणि महाराष्ट्र केसरी किताबाचा मान पटकाविला. तर महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी ठरला. यावेळी विजेत्या पृथ्वीराज मोहोळला (Pruthviraj Mohol) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि चारचाकी गाडी प्रदान करण्यात आली.
पण, महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2025) किताबाची अंतिम लढत वादग्रस्तच ठरली. पृथ्वीराजला एक गुण देण्याचा निर्णय न पटल्याने अखेरची 16 सेकंदआधीच महेंद्रने मैदान सोडले आणि बाहेर गेला, त्यामुळे पंचांनी पुणे जिल्ह्यातील पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले.
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?
अंतिम लढतीला सुरुवात झाली तेव्हा महेंद्रने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला. मात्र त्यात ताकदीने पृथ्वीराजने प्रतिकार करत गुण दिला नाही. अंतिम लढत चालू होऊन 1 मिनीट झाला तरी दोघांच्या खात्यावर एकही गुण नव्हता. यामुळे पंचांनी महेंद्रला ताकिद दिली. त्यानंतर नियमानुसार 30 सेकंदात महेंद्र गुण मिळविण्यात अपयशी ठरल्याने पृथ्वीराजला एक गुण आयता मिळाला. मध्यांतरापर्यंत पृथ्वीराजने 1-0 अशी आघाडी घेतली. मध्यांतरानंतर दोघेही आक्रमक झाले. डावप्रतिडाव सुरू होते, मात्र गुणाची कमाई झाली नाही.
16 सेकंद राहिले असतानाही महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान....
दरम्यान, पृथ्वीराजच्या निष्क्रियतेमुळे महेंद्रला एक गुण देण्यात आल्याने 1-1 अशी बरोबरी झाली. लढत अखेरच्या मिनिटात असताना चढाओढीत महेंद्रला पुन्हा एकदा पंचांकडून ताकीद देण्यात आली. या वेळी पृथ्वीराजने थोडा चपळपणा दाखवत महेंद्र मॅटच्या बाहेर केले, त्यामुळे पृथ्वीराजला एक गुण देण्यात आला आणि पृथ्वीराज एका गुणाने आघाडीवर घेतली. यावर महेंद्र आणि त्याच्या संघाने अपील केले. लढतीची 16 सेकंद राहिली असताना पृथ्वीराज 2-1 असा आघाडीवर होता. मात्र ती अपील फेटाळल्यानंतर महेंद्र मॅट सोडून गेला आणि पुन्हा परतलाच नाही. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला महाराष्ट्र केसरी किताबाचा विजेता जाहीर केले.
महेंद्र गायकवाडही पंचाच्या अंगावर गेला धावून!
महेंद्र गायकवाडचा पराभव झाल्यानंतर तो पण पंचाच्या अंगावर धावून गेला. कारण त्याने शेवटच्या गुणाबद्दल त्याच्या प्रशिक्षकांचा आक्षेप होता. तो सामना संपल्यानंतर मैदानात आल्यावर पोलिसांनी त्याला बाहेर काढले. त्यावेळी कुस्ती संपण्यासाठी फक्त 16 सेकंद उरले, महेंद्रचे प्रशिक्षक त्याला कुस्ती खेळू नको म्हणत होते, त्यानंतर तो बाहेर गेला. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केले.
हे ही वाचा -