Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2024 पूर्वी त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये आणखी एक बदल केला आहे. यावेळी लखनौ फ्रँचायझीने फलंदाजी प्रशिक्षक विजय दहिया यांच्यापासून फारकत घेतली आहे. विजय दाहिया आयपीएल 2022 च्या पहिल्या सत्रापासून म्हणजेच त्यांच्यासोबत होते. आयपीएल 2024 पूर्वी लखनौ सुपर जायंट्सच्या कोचिंग स्टाफमध्ये बरेच बदल होताना दिसत आहेत.






यापूर्वी लखनौ संघात मुख्य प्रशिक्षकांच्या रूपात बदल करण्यात आला होता. अँडी फ्लॉवर 2024 स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामील झाले, त्यानंतर केएल राहुल-कर्णधार असलेल्या लखनौने जस्टिन लँगर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. याआधी टीम मेंटरच्या रूपात बदल पाहायला मिळाला.






माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीरने पहिली दोन वर्षे लखनौसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली, परंतु 2024 च्या आयपीएलपूर्वी तो लखनौ सोडून कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामील झाला. 2024 मध्ये गंभीर केकेआरचा मेंटर म्हणून दिसणार आहे.


आयपीएल 2023 मध्ये लखनौने एलिमिनेटर सामना गमावला 


2023 मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स संघ एलिमिनेटर सामना हरला होता. एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने लखनौचा पराभव केला होता. हे केवळ 2023 मध्येच घडले नाही, तर त्याआधी 2022 मध्ये (आयपीएलमधील लखनौचे पहिले वर्ष) लखनौचा संघ एलिमिनेटर सामना हरला होता. मात्र, 2022 च्या आयपीएलमध्ये लखनौचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध एलिमिनेटर सामना हरला. आता IPL 2024 मध्ये लखनौची कामगिरी कशी होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या