मुंबई: 'फ्लाइंग सिख' म्हणून प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह आपल्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देताना आयुष्यात पाचवेळा अतिशय भावूक झाल्याचे सांगितले.


 

गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत एका कार्यक्रमात त्यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी त्याने 1947 साली देशाची फाळणी, 1960 सालातील रोममधील ऑलम्पिक स्पर्धेत निराशाजनक कामगिरीवरून अतिशय भावूक झाल्याचे सांगितले.

 

फाळणीमुळे उसळलेल्या जातीय दंगलीत माझ्या संपूर्ण कुटुंबीयांचा बळी गेला. वयाच्या 16 व्या वर्षी डोळ्या देखत हत्या होताना पाहून अश्रू आनावर झाले होते. त्यानंतर 1960 साली झालेल्या रोममधील ऑलम्पिक स्पर्धेत निराशाजनक कामगिरीमुळे भावूक झाल्याचेही ते म्हणाले.

 

मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारीत 2013मध्ये 'भाग मिल्खा भाग' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहून फार अस्वस्थ झाल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.