मुंबई: कॅनेडाची प्रसिद्ध कंपनी ब्लॅकबेरीने आपला स्मार्टफोन पासपोर्टच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. या स्मार्टफोनला कंपनीने 2014 साली 49,990 रुपयांना लाँच केले होते. पण सध्या हाच स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 29,990 रुपयांना मिळतो आहे. तर अॅमेझॉनवरील याची किंमत 33,950 रुपये आहे. विशेष म्हणजे, या स्मार्टफोनासाठी सध्या 14,500 रुपयांच्या सवलतीने एक्सचेंज ऑफरही सुरू आहे. त्यामुळे स्मार्टफोनसाठी ग्राहकांना 15,450 रुपये मोजावे लागत आहेत.

 

ब्लॅकबेरी पासपोर्टची स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

 

ब्लॅकबेरी पासपोर्टमध्ये 4.5 एलसीडी टच स्क्रिन असून त्यात 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

 

ब्लॅकबेरी पासपोर्टमध्ये 1440 x 1440 रिझॉल्यूशनसोबत 4.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्पले आहे.

 

ब्लॅकबेरी पासपोर्टमध्ये 2.2 GHz क्वाडकोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम आहे.

 

ब्लॅकबेरी पासपोर्ट कंपनीच्या नव्या ऑपरेटिंग सिस्टीम ब्लॅकबेरी 10.3 ओएसवर चालणारा हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे.

 

यामध्ये कपॅसिटिव्ह टचसोबत सेंसेटिविटीचे हार्डवेअर कीबोर्डच्या 3 लाइन देण्यात आल्या आहेत. यामध्ये यूजर जेस्चरचा वापर केल्याने ऑटो कम्पलीट सजेशन आणि लिस्टमध्ये स्क्रोल करता येऊ शकते.

 

याच्या इअरपीसमध्ये मायक्रोफोन लावण्यात आला आहे. ज्यामुळे नॉइज ओळखून डोन आणि वॉल्यूम करेक्ट ऑडीओ मिळतो.