SRH Auction Strategy 2023 : सर्वात एन्टरटेनिंग क्रिकेट लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी 16व्या हंगामासाठी (IPL 2023) 23 डिसेंबर रोजी लिलाव (IPL 2023 Auction) होणार आहे. दरम्यान या लिलावापूर्वी सर्व संघानी आपल्या कायम ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यावेळी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने आपला कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) रिलीज केल्यामुळे ते या लिलावात काही दमदार परदेशी खेळाडूंना विकत घेण्यात इन्टरेस्टेड असतील. हैदराबादची पर्स व्हॅल्यूही चांगली आहे. त्यामुळे ते नेमके कोणत्या तीन परदेशी खेळाडूंवर दाव लावू शकतात त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...


1.बेन स्टोक्स


इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार आणि सध्याच्या क्रिकेट विश्वातील महान अष्टपैलू मानला जाणारा बेन स्टोक्स (Ben Stokes) सनरायझर्स हैदराबादची लिलावात पहिली पसंती असणार आहे. केन विल्यमसनला रिलीज केल्यानंतर हैदराबाद संघाला कर्णधार आणि मधल्या फळीत संघाला सांभाळेल अशा फलंदाजाची गरज आहे. या भूमिकेसाठी स्टोक्स अगदी योग्य आहे. अशा स्थितीत स्टोक्सला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी हैदराबाद कोणतीही किंमत मोजण्यास तयार असेल हे नक्की!


2.आदिल रशीद


राशिद खानने सनरायझर्स हैदराबाद सोडल्यापासून हैदराबाद संघ एका चांगल्या लेगस्पिनरच्या शोधात आहे. या संघाकडे पाहता इंग्लंडचा स्टार फिरकी गोलंदाज आदिल रशीदवर फ्रँचायझी डाव खेळू शकते, असे मानले जात आहे. रशीदने टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडसाठी शानदार गोलंदाजी केली आणि इंग्लंडला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.


3.अॅडम झाम्पा


आदिल रशीद व्यतिरिक्त, सनरायझर्स हैदराबादला ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पा यालाही संघात घेण्यात इन्ट्रेस्ट आहे. झाम्पा हा टी-20 क्रिकेटमधील उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने केवळ 6.93 च्या इकॉनॉमीसह 82 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत.


लिलावापूर्वी हैदराबादने 12 खेळाडूंना दाखवला घरचा रस्ता 


सनरायजर्स हैदराबाद संघानं 12 खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये केन विल्यमसन याचाही समावेश आहे. त्याशिवाय निकोलस पूरन, जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन एबॉट, शशांक सिंह, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा आणि विष्णु विनोद या खेळाडूंचा समावेश आहे. 


हे देखील वाचा-