बुएनोस एरिस : अर्जेंटिनाचा सुपरस्टार लायनेल मेसीने दोन महिन्यांच्या आतच आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. 2018 च्या विश्वचषक पात्रता सामन्यांसाठी लायनेल मेसीचा अर्जेंटिनाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. लायनेल मेसीने स्वत: या बातमीला दुजोरा दिला आहे.


 

अर्जेंटिनाचा संघ सध्या अनेक अडचणींना सामोरा जातोय, त्यात मी आणखी भर नाही टाकायचीय असं मेसीने म्हटलं आहे.

 

जून महिन्यात झालेल्या कोपा अमेरिकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला चिलीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर निराश झालेल्या मेसीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. मात्र अर्जेंटिनियन फुटबॉल संघांची सध्याची अवस्था पाहून मेसीने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.