मुंबई : भारताच्या लक्ष्य सेननं आशिया ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्यानं या स्पर्धेत अंतिम सामन्यात लक्ष्यनं इंडोनेशियाच्या वितिद सरनचा दोन सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला.

लक्ष्यने हा सामना 21-19, 21-14 असा जिंकत तब्बल 53 वर्षानंतर भारताला पुरुष गटाचं सुवर्णपदक मिळवून दिलं. आशिया ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा लक्ष्य सेन आजवरचा केवळ तिसरा भारतीय बॅडमिंटनपटू ठरलाय.

याआधी 1965 साली गौरव ठक्कर आणि 2012 साली पी व्ही सिंधूनं सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली होती.