Kolkata Knight Riders, IPL 2024: IPL 2024 पूर्वी कोलकाता नाइट रायडर्सने अनेक मोठे बदल केले आहेत. शार्दुल ठाकूर आणि लॉकी फर्ग्युसनसह 12 दिग्गजांना संघाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. केकेआरमधील बदल खरोखरच धक्कादायक आहेत. वर्ल्डकपमध्येही पहिल्या तीन सामन्यात अपेक्षित कामगिरी करता न आल्याने शार्दुलला बाकावर बसावे लागले होते. आता त्याला कोलकाताकडूनही रिलीज करण्यात आल्याने मोठा धक्का बसला आहे.
कोलकात्याच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी
श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, वैभव अरोरा, सुयश शर्मा, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंग, जेसन रॉय.
कोलकाता रिलीज झालेल्या खेळाडूंची यादी
शाकिब अल हसन, लिटन दास, आर्यन देसाई, डेव्हिड व्हीजे, नारायण जगदीसन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टिम सौदी, जॉन्सन चार्ल्स.
राजस्थान रॉयल्सने या खेळाडूंना सोडले
जो रूट
अब्दुल बासित
आकाश वशिष्ठ
कुलदीप यादव
ओबेद मॅकॉय
मुरुगन अश्विन
केसी करिअप्पा
केएम आसिफ
या खेळाडूंना राजस्थान रॉयल्सने कायम ठेवले
संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, कुणाल सिंग राठोड, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, जोस बटलर, डोनोवन फरेरा, ध्रुव जुरेल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, कुलदीप सेन, अॅडम झाम्पा, संदीप शर्मा, अवेश शर्मा खान (एलएसजीकडून ट्रेड)
लखनऊ सुपर जायंट्सचा आवेश खान राजस्थान रॉयल्समध्ये सामील
यापूर्वी राजस्थान रॉयल्सने आवेश खानचा लखनौ सुपर जायंट्सशी व्यवहार केला होता. त्याचवेळी, गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला देवदत्त पडिकल आता लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे.
आयपीएल 2023 च्या मोसमात राजस्थान रॉयल्सला प्ले ऑफमध्ये पोहोचता आले नाही
राजस्थान रॉयल्स आयपीएल 2023 हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरली होती. हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर होता. राजस्थान रॉयल्सने 14 सामने खेळले, 7 जिंकले, तर 7 सामने गमावले. राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2008 चे विजेतेपद पटकावले होते. मात्र त्यानंतर हा संघ आयपीएलचे जेतेपद पटकावण्यात अपयशी ठरला आहे. आयपीएल 2008 हा या स्पर्धेचा पहिला हंगाम होता. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
इतर महत्वाच्या बातम्या