Aniket Jadhav : मागील काही वर्षात भारतात फुटबॉल खेळाला 'अच्छे दिन' येत आहेत. इंडियन सुपर लीग सारखी मोठी स्पर्धा भारतात खेळवली जात आहे. आता अंडर 19 आशियाई कप संघात भारत खेळणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी कोल्हापूरचा आघाडीचा फुटबॉलपटू अनिकेत जाधव (Aniket Jadhav) याचं भारतीय फुटबॉल संघात (Indian Football Team) सिलेक्शन झालं आहे. अनिकेतच्या या सिलेक्शननंतर अनेकांनी त्याला ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
युएई येथे आशियाई फुटबॉल चषक ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. 23 ते 31 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार असून या स्पर्धेसाठी भारताचा 28 जणांचा संघ जाहीर कऱण्यात आला आहे. यावेळी संघात मिडफिल्डर म्हणून अनिकेतला स्थान मिळालं आहे. अनिकेतच्या सिलेक्शननंतर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्वीट करत अनिकेतला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय संघ
फॉरवर्ड्स : विक्रम प्रताप सिंह, रहीम अली, रोहित दानू
मिडफिल्डर्स : एसके साहिल, सुरेश सिंह, अमरजीत सिंह, लेलेंगमाविया, जेकसन सिंह, दीपक टांगरी, राहुल केपी, कोमल थटल, निखिल राज, ब्रायस मिरांडा, प्रिन्स्टन रेबेलो, अनिकेत जाधव
डिफेन्स : नरेंद्र गहलोत, बिकास युम्नम, एलेक्स साजी, होर्मीपम रुईवा, हॅलेन नोंगट्डू, आशिष राय, सुमित राठी, आकाश मिश्रा, साहिल पवार.
गोल किपर्स : धीरज सिंह मोइरंगथेम, प्रभुसुख सिंह गिल, प्रतीक कुमार सिंह, मोहम्मद नवाज.
हे ही वाचा -
- IND vs SL, 1st Test: रविंद्र जडेजानं रचला इतिहास, कपिल देवचा 'हा' विक्रम मोडला
- Sushil Kumar : कुस्तीपटू सुशील कुमार जेलमध्ये देणार कुस्तीचे धडे, तिहार जेल प्रशासनाची माहिती
- 'अनुष्का ग्राऊंडवर काय करतेय?' विराट कोहलीच्या 100व्या कसोटी सामन्या दरम्यान नेटकऱ्यांकडून ट्रोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha