लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजची धडाकेबाज खेळाडू डिएंड्रा डॉटिन मैदानावर उतरते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कायम मास्क लावलेलं असतं. पण ती मास्क का लावत असावी, असं प्रश्न अनेकांना पडला असेल. तर ड्रिएंड्रा आणि तिच्या मास्कची कहाणी जाणून घेऊया.
डिसेंबर 2016 मध्ये मैदानावर झालेल्या अपघातात डिएंड्राच्या गालाचं हाड तुटलं होतं. ते पुन्हा जोडण्यासाठी ती हे मास्क लावते.
महिला बिग बॅश लीगच्या एका सामन्यात ब्रिस्बेन हीट्स सांघाची डिएंड्रा डॉटिन मेलबर्न स्टार्सविरुद्धच्या सामन्यात खेळत होते. यावेळी तिची लॉरा हॅरिससोबत जोरदार धडक झाली. यामध्ये डिएंड्रा हाडात अनेक फ्रॅक्चर्स होते. शिवाय डोळ्याला गंभीर दुखापत होण्यापासून ती बचावली होती.
शस्त्रक्रियेनंतर अनेक टायटॅनियम प्लेट आणि स्क्रू लावले होते. मात्र चार आठवड्यानंतरच ती मैदानावर परतली.
महिला क्रिकेटमध्ये ट्वेण्टी-20 मधील सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम डिएंड्रा डॉटिनच्या नावावर आहे. या विश्वचषकात ती आपल्या कारकीर्दीतील शंभरावा सामना खेळली होत.
परंतु वेस्ट इंडिज आणि डिएंड्रासाठी हा विश्वचषक फारसा चांगला ठरला नाही. तीन सामन्यांपैकी तिन्ही सामने हरल्याने वेस्ट इंडिजचा संघ गुणतालिकेत तळाला आहे.