केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताकडून केएल राहुलने (KL Rahul) सर्वाधिक धावा केल्या. त्याने शतक झळकावले. मात्र, तो भारताचा डावाने पराभव टाळू शकला नाही. असे असूनही, सुनील गावसकर यांनी लोकेश राहुलच्या शतकाला भारताकडून कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च 10 शतकांपैकी एक म्हटले आहे. केएल राहुलने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी चांगली कामगिरी केली होती.


पत्नी अथिया शेट्टीने पुनरागमनात कशी मदत केली?


केएल राहुलने अलीकडेच पत्नी अथिया शेट्टीकडून (KL Rahul on Wife Athiya Shetty) दुखापत आणि रिकव्हर होताना मिळालेला पाठिंबा आणि त्याची छोटीशी अंधश्रद्धा उघड केली. राहुल आणि अथियाचे 2023 मध्ये लग्न झाले होते. अथिया ही बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक सुनील शेट्टी यांची अभिनेत्री मुलगी आहे. तो म्हणाला की, ती माझ्यासोबत होती, प्रत्येक गोष्टीत ती माझ्यासोबत असायची. बहुतेक दिवस ती माझ्यापेक्षा जास्त निराश आणि रागावलेली होती. म्हणून, मी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तिला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. मला अशाप्रकारे पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. 


वेळेचा सदुपयोग केला


केएल पुढे म्हणाला की, आम्हा दोघांसाठी हे अवघड होते, पण त्यामुळे आम्हाला आवश्यक असलेला वेळही मिळाला. मला असे वाटले की मला पुन्हा त्याच प्रक्रियेकडे परत जावे लागेल. मला नकारात्मकता जाणवत होती. मी फक्त आनंदी राहिलो आणि आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद लुटला आणि घरी राहणे, माझ्या पत्नीसोबत राहणे, माझ्या कुटुंबासोबत असण्याचा आनंद घेतला, ज्यामुळे मला बरे होण्यास आणि खूप लवकर परत येण्यास मदत झाली.






तर ती मला मारेल, केएल राहुल असं का बोलला?


केएल राहुलने खुलासा केला की, तो मैदानावर असताना पत्नीचा विचार करत नाही. त्याचे रहस्य उघड करताना तो म्हणाला की, ती मला मारून टाकेल, पण मी मैदानात उतरल्यावर तिच्याबद्दल विचार करत नाही. हे फक्त क्रिकेटबद्दल आहे. मला हे अनरोमँटिक पद्धतीने म्हणायचे नाही. ती माझ्यासाठी काय करते, ती माझ्यासाठी जीव ओवाळून टाकण्यासाठी तयार असते. ती मला खूप प्रेम देते.


पत्नीचे कौतुक करत तो म्हणाला की, ती मला पुश करत असते.ती मला अधिक चांगले होण्याचे आव्हान देते. मैदानाबाहेर ती माझ्या आयुष्यात उत्साह आणते. साहजिकच ती मला समजते. म्हणूनच बोलणे माझ्यासाठी सोपे आहे. माझे काम संपताच मी बोलतो. जेव्हा मी खेळून मोकळा असतो तेव्हा किंवा मी खेळायला जाण्यापूर्वी, जेव्हा मी उठतो तेव्हा मी तिच्याशी बोलतो. कारण तुम्ही योग्य व्यक्तीशी लग्न केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या