Muhammad Waseem Six Record : जेव्हा जेव्हा षटकार मारण्याचा किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांचा विक्रम येतो तेव्हा पहिला विचार भारतीय कर्णधार रोहित शर्माचा येतो. सध्या रोहित शर्मा हा अशा खेळाडूंपैकी एक आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकार मारताना कोणालाही आपल्या जवळ सुद्धा जाऊ देत नाही. जर आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये रोहित शर्मापेक्षा मोठा सिक्स मारणारा फलंदाज आहे, असे जर आम्‍ही तुम्‍हाला सांगितले तर तुमचा विश्‍वास बसणार नाही, पण तसे आहे. यूएईच्या मोहम्मद वसीमने रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे.






यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता, जो आता संयुक्त अरब अमिरातीच्या मुहम्मद वसीमने घेतला आहे. रोहित शर्माचा विक्रम मोडण्यासोबतच वसीमने एक खास विक्रमही केला जो आजपर्यंत कोणीही करू शकले नाही. खरं तर, UAE चा वसीम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 100 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात कोणत्याही फलंदाजाने 80 पेक्षा जास्त षटकार मारले नव्हते, 80 षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता, जो आता मोडित झाला आहे.


गेल्यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये मुहम्मद वसीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 101 षटकार मारले होते, तर 80 षटकार मारणारा रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर होता. वसीम 2023 मध्ये टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट खेळला. त्याच वेळी, भारतीय कर्णधाराने 2023 मध्ये एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळले. 2023 मध्ये रोहितने एकही T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज



  • 2023 मध्ये 101 षटकार- मोहम्मद वसीम (UAE)

  • 2023 मध्ये 80 षटकार - रोहित शर्मा (भारत)

  • 2019 मध्ये 78 षटकार - रोहित शर्मा (भारत)

  • 2018 मध्ये 74 षटकार - रोहित शर्मा (भारत)

  • 2022 मध्ये 74 षटकार - सूर्यकुमार यादव (भारत).


इतर महत्वाच्या बातम्या