IPL 2021, KKR vs DC : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आज दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सामना रोमांचक ठरला.  शारजाहच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाताने दिल्लीवर 4 विकेट्सनी विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक घेतली आहे.  या  सामन्यात राहुल त्रिपाठीने मोक्याच्या क्षणी षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला आहे कोलकाता आपल्या तिसऱ्या आयपीएल किताबावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाली आहे.


कोलकाताच्या विजयचा शिल्पकार वेंकटेश अय्यर आहे. अय्यरने  चार चौकार आणि तीन षटकारासह  41 बॉलमध्ये 55  धावा केल्या आहे. राहुल त्रिपाठीने मोक्याच्या क्षणी षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला आहे. आयपीएल 2014 प्रमाणे संघ पुन्हा एकदा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.



आयपीएलच्या दुसऱ्या क्वालीफायरमध्ये पहिल्यांदा मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाने 20 षटकात 135  धावा केल्या. दिल्लीसाठी शिखर धवनने सर्वाधिक 36 धावा केल्या आहे. तर  श्रेयस अय्यरने नाबाद  27 बॉलमध्ये 30 धावा केल्या आहे.  कॅप्टन ऋषभ पंत (6) आणि  शिमरन हेटमायर (17) धावा करत तंबूत परतले. अय्यरने शेवटपर्यंत फलंदाजी करत  27 बॉलमध्ये एका चौकार आणि एक षटकारसह नाबाद 30 धावा केल्या.  कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने 26 धावा देत दोन विकेट घेतले. या शिवाय शिवम वामी आणि लॉकी फर्ग्युसन प्रत्येकी एक विकेट घेतले. 


कोलकाता नाइट राइडर्सचा संभाव्य संघ : शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, इयोन मोर्गन (कर्णधार), नितीश राणा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाकिब अल हसन, सुनील नरेन, लॉकी फर्ग्यूसन,  वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावी.


दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ : शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), शिमरोन हेटमायर, टॉम कर्रन, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कॅगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि आवेश खान.