मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत  चढ- उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज  2, 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 139  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 11  हजार 075  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे. 
 
राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 281  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (10), नंदूरबार (2),  धुळे (8), जालना (37), परभणी (53), हिंगोली (18), नांदेड (14),  अमरावती (96), अकोला (27), वाशिम (05), बुलढाणा (14), यवतमाळ (08), नागपूर (70),  वर्धा (4), भंडारा (2), गोंदिया (3),   गडचिरोली (13 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


राज्यात सध्या 29 हजार 555 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,32,261 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,122  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 05, 46, 572  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,83, 896 (10.87टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


मुंबईत गेल्या 24 तासात 481 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 481 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 461 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,25,282 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5114 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1102 दिवसांवर गेला आहे.


देशात गेल्या 24 तासांत 15 हजार 823 नव्या कोरोनाबाधितांची नोंद


 देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, आज (बुधवारी) 24 तासांत कोरोनाच्या 15 हजार 823 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 226 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल देशात 14 हजार 313 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 
आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 22 हजार 844 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 2 लाख 7 हजार 653 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी 33 लाख 42 हजार 901 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 51 हजार 189 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.