KKR vs MI, LIVE Updates : मुंबईचं कोलकातासमोर 153 धावांचं लक्ष्य, कोलकाताची दमदार सुरुवात

IPL 2021 KKR vs MI, LIVE Score : मुंबईचा संघ यंदाच्या सीझनमधील आपला पहिला विजय मिळवण्यासाठी आज मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीने मुंबईचा पराभव केला होता. अशातच आज यंदाच्या सीझनमधील आपला दुसरा सामना केकेआर विरोधात खेळणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Apr 2021 06:40 PM
KKR vs MI, LIVE Updates : मुंबईचं कोलकातासमोर 153 धावांचं लक्ष

KKR vs MI, LIVE Updates : मुंबईचं कोलकातासमोर 153 धावांचं लक्ष

KKR vs MI, LIVE Score : मुबईला तिसरा धक्का इशांत किशन 1 धाव करुन बाद, मुंबईची धावसंख्या 88/3

KKR vs MI, LIVE Score  : मुबईला तिसरा धक्का इशांत किशन 1 धाव करुन बाद, मुंबईची धावसंख्या 88/3 

KKR vs MI, LIVE Updates : सूर्यकुमार यादव 56 धावांवर बाद, मुंबईची धावसंख्या 86/2

KKR vs MI, LIVE Updates : सूर्यकुमार यादव 56 धावांवर बाद,  मुंबईची धावसंख्या 86/2

KKR vs MI, LIVE Updates : मुंबईची धावसंख्या 10 ओव्हरनंतर 81/1

KKR vs MI, LIVE Updates : मुंबईची धावसंख्या 10 ओव्हरनंतर 81/1

KKR vs MI, LIVE Updates : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, 33 चेंडूत झळकावलं अर्धशतक

KKR vs MI, LIVE Updates : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, 33 चेंडूत झळकावलं अर्धशतक

KKR vs MI, LIVE Updates : रोहित शर्मा-सूर्यकुमार क्रिजवर, मुंबईची धावसंख्या 71/1

KKR vs MI, LIVE Updates : रोहित शर्मा-सूर्यकुमार क्रिजवर, मुंबईची धावसंख्या 71/1

KKR vs MI, LIVE Updates : रोहित शर्मा-सूर्यकुमार क्रिजवर, मुंबईची धावसंख्या 60/1

KKR vs MI, LIVE Updates : रोहित शर्मा-सूर्यकुमार क्रिजवर, मुंबईची धावसंख्या 60/1

मुंबईची धावसंख्या 4 ओव्हरनंतर 28/1

मुंबईची धावसंख्या 4 ओव्हरनंतर 28/1

KKR vs MI LIVE Score: मुंबईला पहिला धक्का, क्विंटन डिकॉक 2 धावांवर बाद

KKR vs MI LIVE Score: मुंबईला पहिला धक्का, क्विंटन डिकॉक 2 धावांवर बाद

रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉककडून मुंबईच्या डावाची सुरुवात

रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉककडून मुंबईच्या डावाची सुरुवात, ख्रिस लीनच्या जागी क्विंटन डिकॉकला संधी

पार्श्वभूमी

IPL 2021, KKR vs MI : आयपीएलमध्ये आज कोलकाता आणि मुंबई यांच्यात सामना रंगणार आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. मुंबईचा संघ यंदाच्या सीझनमधील आपला पहिला विजय मिळवण्यासाठी आज मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीने मुंबईचा पराभव केला होता. अशातच आज यंदाच्या सीझनमधील आपला दुसरा सामना केकेआर विरोधात खेळणार आहे. अशातच केकेआरनं हैदराबादचा 10 धावांनी पराभव केला होता. 


मुंबईसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईचा स्टार ओपनर डी कॉक आजच्या सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. डी कॉक 7 एप्रिल रोजी दक्षिण आफ्रिकाहून भारतात आला होता. त्यामुळे आयपीएलच्या नियमांनुसार, डी कॉकला सात दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहावं लागलं होतं. 13 एप्रिलला डी कॉकचा क्वॉरंटाईनचा अवधी संपत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या कोलकातासोबतच्या सामन्यात डी कॉक ओपनर बॅट्समन म्हणून मैदानावर उतरु शकतो. 


रोहित शर्मा आणि डी कॉक करु शकतो ओपनिंग 


डी कॉकच्या अनुपस्थितीत आरसीबी विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत क्रिस लिन ओपनर म्हणून मैदानावर उतरला होता. क्रिस लिनने या सामन्यात 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 35 चेंडूंमध्ये 49 धावांची खेळी केली होती. परंतु, जर डी कॉकचा आजच्या सामन्यात संघात समावेश झाला तर मात्र क्रिस लीनला संघाबाहेर बसावं लागू शकतं. तसेच सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा आजच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. त्यानंतर इशान किशन चौथ्या क्रमांकावर, कायरन पोलार्ड पाचव्या क्रमांकावर आणि हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. 


तीन वेगवान गोलंदाजांना मिळू शकतं संघात स्थान 


बंगलोरच्या विरोधातील सामन्या प्रमाणेच मुंबईचा संघ या सामन्यातही तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट दोघांचाही संघात समावेश असणार आहे. तर तिसऱ्या गोलंदाजाच्या रुपात दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर मार्को जानसेनने आपला पहिल्या सामन्यात उत्तम खेळी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात संघात त्याला संधी मिळू शकते. तसेच स्पिनर म्हणून कृणाल पांड्या आणि राहुल चहर यांच्या खांद्यावर असेल. 


मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ :


क्विन्टन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन (विकेटकीपर), कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल चहर, मार्को जानसेन, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.