Khelo India Youth Games: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथील टेलरचा मुलगा आदिल अल्ताफनं (Adil Altaf) खेलो इंडिया युथ गेम्समध्ये जम्मू- काश्मीरसाठी पहिलं सायकलिंग सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी त्याचं अभिनंदन केलंय. याआधी त्यानं 28 किमी शर्यतीत रौप्य पदक जिंकलं होतं. 


विजयानंतर अल्ताफ काय म्हणाला?
अल्ताफसाठी हा महत्वपूर्ण विजय होता. या स्पर्धेत त्याला  त्याला सिद्धेश पाटील (महाराष्ट्र) आणि  अर्शद फरीदी (दिल्ली) यांच्यासह अधिक उत्साही सायकलपटूंनी उभे केलेल्या आव्हानांना झुंज द्यावी लागली. विजयानंतर अल्ताफनं मोठी प्रतिक्रिया दिली. हा माझ्यासाठी मोठा क्षण आहे. चांगली कामगिरी करण्याच्या आत्मविश्वासामुळं मला इथपर्यंत पोहचता आलंय.


ट्वीट-



लहानपणापासून सायकलिंगची आवड
लहानपणापासून अल्ताफ मध्य काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील लाल बाजारच्या गल्लीबोळात सायकल चालवायचा. त्याला सायकल चालवायला खूप आवडायचं आणि त्याच्या वडिलांसाठी साकलवरून सामन ने-आण करायचा. तो पंधरा वर्षाचा असताना त्याला प्रथमच त्याच्या शाळेत झालेल्या काश्मीर हार्वर्ड येथे झालेल्या सायकलिंग स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यानं हा खेळ अतिशय गांभीर्यानं घेतला.


अल्ताफची आवड जोपासण्यासाठी त्याच्या वडिलांची दुप्पट मेहनत
अल्ताफ हा गरिब कुटुंबामधून आला आहे. त्याच्या वडिलांनी त्याची आवड जोपासण्यासाठी त्याला सायकल विकत घेऊन देण्यासाठी दुप्पट मेहनत घेतली. त्यानं स्थानिक स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केल्यामुळं श्रीनगरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्या मदतीसाठी पुढे आली आणि त्याची एमटीबी बाईकला प्रायोजित केली. ज्याची किंमत 4.5 लाख रुपये होती. 18 वर्षीय अल्ताफ गेल्या सहा महिन्यांपासून एनआयएस पटियाला येथे खेलो इंडिया गेम्ससाठी तयारी करत होता.


हे देखील वाचा-