Kho Kho World Cup 2025 : महिलांनंतर भारताच्या पुरुष संघानेही खो-खो च्या विश्वचषक स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. भारतीय पुरुष संघाने अंतिम सामन्यात नेपाळचा पराभव करत खो-खो विश्वचषक आपल्या नावावर केलाय. भारतीय संघाने नेपाळला 54-36 च्या फरकाने पराभूत केलंय.  नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात टीम इंडियाने मोठा विजय मिळवलाय. पुरुष संघापूर्वी महिला संघाने देखील विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे  आजचा दिवस भारताला दुहेरी आनंद देणारा ठरलाय. 


खो-खो विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र, पहिल्या डावात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत 26 गुण मिळवले. या कालावधीत नेपाळ संघाला एकही गुण घेता आला नाही. नेपाळला पहिल्या डावात खात देखील उघडता आलं नाही. तर दुसऱ्या डावात नेपाळने पुनरागमन करत चांगले गुण मिळवले. दुसऱ्या डावात नेपाळने 18 गुणांची कमाई केली. मात्र, दुसऱ्या डावातही टीम इंडिया आघाडी घेण्यात यशस्वी ठरली. दुसऱ्या डावानंतर भारताकडे आठ धावांची आघाडी होती. 


तिसऱ्या आणि चौथ्या डावात भारताचं दमदार प्रदर्शन 




दरम्यान तिसऱ्या डावात भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत नेपाळवर पुन्हा वर्चस्व मिळवले. या डावात भारताने 50 पेक्षा जास्त गुण मिळवले. तर तिसऱ्या डावात देखील भारतीने चुणूक दाखवली. चौथ्या डावातही टीम इंडियाने आघाडी कायम राखत विजेतेपदावर कब्जा केला. भारतीय संघाने तिसऱ्या डावापर्यंत आघाडी कायम ठेवली होती. चौथ्या डावातही भारतीय संघाने सातत्य ठेवले.  टीम इंडियाने सामन्याच्या अखेरीस नेपाळचा 54-36 असा पराभव केला.


भारतीय पुरुष खो-खो संघाने या विश्वचषकात दुसऱ्यांदा नेपाळ संघाचा पराभव केला आहे. याआधी भारत आणि नेपाळमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यातही टीम इंडिया विजय मिळवण्यात यशस्वी ठरली होती. पुरुषांच्या खो-खो विश्वचषकाच्या पहिल्या सत्रात एकूण 20 संघांनी भाग घेतला.


पुरुष संघाच्या अगोदर महिलांनीही विश्वचषक जिंकला 


पुरुषांच्या सामन्यापूर्वी महिला संघाचा अंतिम सामना खेळवण्यात आला. जिथे भारतीय महिला संघाने नेपाळचा 78-40 असा पराभव करून विश्वचषक जिंकला. पुरुष आणि महिलांनी खो-खो विश्वचषक जिंकल्याने भारतासाठी आजचा दिवस दुहेरी आनंद देणारा ठरलाय. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Kho Kho World Cup : मराठमोळ्या मुलीच्या नेतृत्वात भारताने पहिला खो-खो विश्वचषक जिंकला, बीडच्या प्रियंका इंगळेचा धमाका