नवी दिल्ली : इंग्लंडचा दिग्गज खेळाडू केव्हिन पीटरसनने 2019 पर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. पीटरसन 2013-14 पासून इंग्लंडच्या संघापासून दूर आहे.
टी-20 ब्लास्टमध्ये खेळताना पीटरसनने सरे या संघाकडून खेळताना सहा महिन्यांनंतर दमदार पुनरागमन केलं. या सामन्यात अर्धशतक ठोकून आपल्यात अजूनही क्रिकेट खेळण्याची क्षमता असल्याचं त्याने दाखवून दिलं.
पीटरसनच्या या खेळीच्या जोरावरच सरेने 10 धावांनी विजय मिळवला. त्याने 35 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या. या खेळीनंतर बोलताना त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघातून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले.
अजून बराच वेळ आहे. येत्या दोन वर्षात सर्व काही ठिक झालं तर दक्षिण आफ्रिकेच्या संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करु शकतो, असं पीटरसन म्हणाला.
पीटरसनने इंग्लंडकडून 104 कसोटी सामने, 136 वन डे आणि 37 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत 61.72 च्या स्ट्राईक रेटने त्याने 8 हजार 181 धावा केल्या आहेत. तर वन डेत 86.58 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 440 धावा त्याच्या नावावर आहेत. आणि टी-20 मध्ये 141.51 च्या स्ट्राईक रेटने 1176 धावा ठोकल्या आहेत.
पीटरसन दक्षिण आफ्रिकेच्या संघातून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jul 2017 08:36 AM (IST)
टी-20 ब्लास्टमधील दमदार पुनरागमनानंतर बोलताना पीटरसनने दक्षिण आफ्रिकेच्या संघातून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -