Keshav Maharaj On Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरू आहे. उद्या सोमवारी (22 जानेवारी) राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर केशव महाराजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केशव महाराज अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेकासाठी शुभेच्छा देत आहे. या व्हिडीओमध्ये केशव महाराज सांगत आहे, तुम्हा सर्वांना नमस्कार... दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या वतीने अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेकासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.






केशव महाराजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 


केशव महाराजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स केशव महाराजच्या व्हिडिओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. केशव महाराज अनेकदा मंदिरात पूजा करताना दिसतो. नुकतंच केशव महाराजने भारतातील मंदिरांना भेट दिली होती. उद्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. याशिवाय अनेक क्रिकेटपटूंसह इतर क्षेत्रातील दिग्गजांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या यादीत सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, कपिल देव आणि सुनील गावस्कर यांसारख्या क्रिकेटपटूंच्या नावांचा समावेश आहे.


किती क्रिकेटपटूंना निमंत्रण मिळाले?


दरम्यान, भारतरत्न सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त माजी कर्णधार कपिल देव, सुनील गावसकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, सौरभ गांगुली, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग आणि भारतीय क्रिकेट प्रशिक्षक राहुल द्रविड यांना राम मंदिर सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाले आहे. रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी, फुटबॉलपटू कल्याण चौबे, धावपटू कविता राऊत आणि पॅरालिम्पिक भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. महिला क्रिकेटची कर्णधार मिताली राज, हरमनप्रित कौर, स्मृती मानधना, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू आणि त्यांची प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनाही निमंत्रण मिळाले आहे. मात्र, त्यांच्यापैकी कोण प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


इतर महत्वाच्या बातम्या