"शेवटचा सामना जिंकू शकलो नाही, याची खंत आहे.
मात्र माझ्या कामगिरीवर मी संतुष्ट आहे.
यापुढे आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न राहिल",
असं केदारने नमूद केलं.
या सामन्यात इंग्लंडनं भारताला विजयासाठी 322 धावांचं लक्ष्य दिलं होतं. अखेरच्या षटकांत भारताला विजयासाठी 16 धावा हव्या असताना, केदार जाधवनं पहिल्या दोन चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार ठोकून 10 धावा वसूल केल्या. पण पुढच्या दोन चेंडूवर त्याला एकही धाव मिळू शकली नाही. त्यामुळं पाचव्या चेंडूवर विजयी षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात बाद झाला. डीप पॉइंटला सॅम बिलिंग्सनं त्याचा झेल पकडला. केदार जाधवनं 75 चेंडूंत 12 चौकार आणि एका षटकारासह 90 धावांची झुंजार खेळी उभारली. पण पुण्याच्या पहिल्या वन डेसारखं त्याच्या खेळीला विजयाचं सुख लाभलं नाही.