केन विल्यम्सन सनरायझर्स हैदराबादचा नवा कर्णधार
एबीपी माझा वेब टीम | 29 Mar 2018 01:59 PM (IST)
डेव्हिड वॉर्नर कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : डेव्हिड वॉर्नर कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनकडे हैदराबादच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने बॉल टॅम्परिंग केली. याची आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची कर्णधार आणि उपकर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. राजस्थान रॉयल्सने यापूर्वीच स्मिथकडून कर्णधारपद काढून घेतलं आहे. त्याच्या जागी कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या बंदीच्या निर्णयानंतर बीसीसीआयनेही मोठी निर्णय घेतला. यंदाच्या आयपीएलमध्येही या दोघांना (स्मिथ आणि वॉर्नर) खेळता येणार नाही, असं आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं. सर्व फ्रँचायझींनी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची रिप्लेसमेंट करणं गरेजचं आहे. कारण, ते दोघेही यावर्षीच्या आयपीएलमध्ये खेळणार नाहीत, अशी माहिती राजीव शुक्ला यांनी दिली.