इंग्लंडला धक्का, चेन्नई कसोटीतून अँडरसनची माघार
एबीपी माझा वेब टीम | 15 Dec 2016 06:22 PM (IST)
चेन्नई : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या चेन्नई कसोटीतून माघार घेतली आहे. अँडरसनचं अंग दुखत असून, तो या कसोटीत खेळणार नसल्याचं इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कूकनं स्पष्ट केलं. मालिकेत 0-3 ने पिछाडीवर असलेल्या इंग्लंडला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड दुखापतीतून सावरला असून, चेन्नई कसोटीत त्याला खेळण्याची संधी मिळू शकते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि अखेरची कसोटी उद्यापासून चेन्नईत खेळवली जात आहे. मात्र अगोदरच पराभवाचा सामना करत असलेल्या इंग्लंड संघाची गोलंदाजीची धार आणखी मंदावण्याची शक्यता आहे.