पत्रकारांशी बोलताना मॉर्गन म्हणाला की, 'मी यासाठी उत्सुक आहे. भारतात भारताविरुद्ध खेळणं हा एक खास अनुभव आहे. त्याची टीम मजबूत असून त्यांना त्यांच्या भूमीत हरवणं कठीण आहे. पण हे आव्हान स्वीकारण्यास आम्ही सज्ज आहोत.' असं मॉर्गन म्हणाला. मॉर्गन आणि जोस बटलर हे एका प्रचार कार्यक्रमात उपस्थित होते.
याचवेळी मॉर्गनला धोनीचा राजीनामा आणि कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मॉर्गन म्हणाला की, 'तो नैसर्गिकरित्या उत्तराधिकारी आहे. पण आम्ही विरोधी संघाकडे फार पाहत नाही. आम्ही आमच्या आणि त्यांच्या प्रदर्शनावर लक्ष केंद्रीत करतो.'
दरम्यान, कसोटी मालिकेत इंग्लंडचा 4-0 असा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे 15 जानेवारीपासून पुण्यात सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत भारताच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहणार आहे.
यावेळी जोस बटलर म्हणाला की, 'वनडे मालिका ही कसोटी मालिकेपेक्षा नक्कीच वेगळी असेल. आमचा संघ वेगळा आहे. त्यानुसार आम्ही प्रत्येक सामन्यासाठी तयार होऊ.' असं बटलर म्हणाला.